Wednesday, December 10, 2025
Google search engine
HomeGraminनगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शेतकरी संघटनेची वज्रमूठ,ॲड. वामनराव चटप आणि सुभाष धोटे...

नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शेतकरी संघटनेची वज्रमूठ,ॲड. वामनराव चटप आणि सुभाष धोटे यांनी केली युतीची घोषणा

नगर परिषद राजुरा च्या निवडणुकीसाठी अखेर काॅग्रेस व शेतकरी संघटना यांच्या युतीची रितसर घोषणा ११ नोव्हेंबरला राजुरा येथील छत्रपती शिवाजी संकुल येथे झालेल्या सभेत करण्यात आली. यामुळे या बहुप्रतीक्षित युतीला अखेर नेते व कार्यकर्त्यांनी मान्यता देत काँग्रेस आणि शेतकरी संघटनेची वज्रमूठ अधिक घट्ट बनली असून संपुर्ण निवडणूक एकदिलाने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर काॅग्रेस १२ आणि शेतकरी संघटना ९ जागांवर लढणार आहेत. नगर विकास आघाडीचे नगराध्यक्ष उमेदवार काॅग्रेस चे अरूण धोटे राहणार असल्याचे यावेळी घोषित करण्यात आले. यावेळी भरगच्च उपस्थिती असलेल्या सभागृहात जोरदार टाळ्यांच्या गजरात या युतीचे स्वागत करण्यात आले.

या सभेत सर्व उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला. या युतीमुळे दोन्ही पक्षांच्या काही इच्छूकांना उमेदवारी देता आली नसली तरी सर्वांनी मिळून मिसळून कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, निळकंठराव कोरांगे, माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, महिला काॅग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. कुंदा जेनेकर, ॲड.दिपक चटप, यांच्यासह काॅग्रेस व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!