HomeUncategorizedवरोऱ्यात शेतकऱ्यांचे चक्का जाम शेतकरी व जनसामान्यांच्या न्याय मागण्या घेऊन आंदोलक...

वरोऱ्यात शेतकऱ्यांचे चक्का जाम शेतकरी व जनसामान्यांच्या न्याय मागण्या घेऊन आंदोलक आक्रमक

चंद्रपूर:
चंद्रपूर जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. अशात सरकार इव्हेंट आणि तोंडाला पाने पुसणाऱ्या कोऱ्या घोषणा करत आहे. अशा असंवेदनशील सरकारच्या विरोधात वरोऱ्यात वातावरण तापले असून शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी चक्का जाम करून आपला रोष व्यक्त केला. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात हे चक्का जाम आंदोलन करण्यात येत असून प्रशासनात यामुळे खळबळ माजली आहे. आंदोलकांनी अत्यंत वेगवान असलेल्या चौकात वाहतूक रोखून धरल्याने पोलिसांची तारांबळ उडाली आहे.


डॉ. अब्दुल कलाम चौंक रत्नमाला चौक येथे शेकडो शेतकरी आणि जनसामान्य एकत्र झाले. सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत नारेबाजी करण्यात आली. भाजप आपल्या जाहीरनाम्यानुसार वागत नाही. संपूर्ण शेतक-यांना सरसकट कर्जमाफीचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या भाजपने शेतकरीच नव्हे सर्वसामान्य नागरिकांचे सर्वच दृष्टीने कंबरडे मोडले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेज ची गरज आहे.
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व सोयविनला हेक्टरी ५० हजार व कापसाला हेक्टरी १ लाखांनी नुकसान भरपाई द्या, निराधारांना रु. २५०० अनुदान द्या, ओला दुष्काळ जाहीर करा अशा अनेक महत्वाच्या मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या. बातमी लिहे पर्यंत पोलिस वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त होते.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular