Homeचंद्रपूरशहरात उद्या श्री साईबाबा चर्म पादुका आगमन

शहरात उद्या श्री साईबाबा चर्म पादुका आगमन

श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी कडून काढण्यात आलेल्या श्री साईबाबा चर्म पादुका रथाचे आगमन चंद्रपूर शहरात सोमवारी होत आहे. आओ साई पालखी सेवा समिती व दाताला येथील श्री साईबाबा देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने या निमित्त गजर साईनामाचा आनंद भक्ती सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. रविवारी आयोजित पत्रपरिषदेत हि माहिती देण्यात आली. या सोहळ्यात सोमवारी सकाळी दहा वाजता १०८ जोडप्यांद्वारे भव्य श्री साई महायज्ञ होईल. त्यानंतर दिवसभर रक्तदान शिबीर सुरु राहील. रक्तदात्यांना थेट श्री साई चरणांचे दर्शन करता येईल. या निमित्त निर्माण केलेली श्री साई समाधी मंदिर प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र असणार आहे. तर रात्री प्रख्यात गायक कार्तिकी गायकवाड आणि कौस्तुभ गायकवाड यांच्या साई भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular