HomeBreakingभरधाव ट्रॅव्हल्सची वृद्ध इसमास धडक, इसमाचा जागीच मृत्यू, सावली येथील घटना

भरधाव ट्रॅव्हल्सची वृद्ध इसमास धडक, इसमाचा जागीच मृत्यू, सावली येथील घटना

भरधाव ट्रॅव्हल्सची वृद्ध इसमास धडक, इसमाचा जागीच मृत्यू, सावली येथील घटना

भरधाव ट्रॅव्हल्सने वृद्ध इसमास समोरून धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सावली येथे शुक्रवारी रात्री घडली. हि संपूर्ण घटना सावित्रीमाई फुले चौकातल्या एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पुरुषोत्तम मोहुर्ले असे मृतकाचे नाव असून तो कट्टर ओबीसी समर्थक असल्याचे सांगितले जात आहे . पुरुषोत्तम हा शुक्रवारी नागपूर येथे आयोजित ओबीसी महा मोर्चात गेला होता. तिथून रात्री आपल्या गावी सावली येथे रात्री परतल्यावर तो मुख्य मार्ग ओलांडत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स ने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी ट्रॅव्हल चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सावली पोलीस करीत आहे. ओबीसीचा कट्टर समर्थक असलेला पुरुषोत्तम मोहूर्ले यांच्या निधनाने सावली येथे शोककळा परसली आहे.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular