HomeBreakingरस्ता दुरस्त न झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्था व इतर सार्वजनिक निवडणुकीत...

रस्ता दुरस्त न झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्था व इतर सार्वजनिक निवडणुकीत मतदानावर करणार गावकरी बहिष्कार

चिमूर तालुक्यातील चकलोहारा मागील 30 वर्षापासून चकजाटेपार टी पॉइंट ते चकलोहारा हा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खराब स्तीतीत आहे. गेल्या 30 वर्षा पासून या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती अथवा बांधकाम झालेले नाही पावसाळ्यात रस्ता चिखलाने भरतो. यामुळे वाहन तसेच पायदळ जाने कठीन झाले आहे. शाळेकरी मुलांना, लोकांना व रुग्णांना जाण्या येण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक वेळा सायकल, मोटार सायकल ने खाली पडून अपघात होऊन अनेकांना दुखापत झालेली आहे.

गावाकऱ्यांनी अनेक वेळा चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांना निवेदने देऊन व प्रत्येक्ष भेटून याची माहिती दिली आहे .परंतु त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केलेअसून काम काहीच केले नाही व कोणत्याच बांधकाम कार्यालयातून आज पर्यंत काहीच कार्यवाही केलेली नाही .या उलट गावकऱ्यांची फसवणूक झाली असे निदर्शनात आले आहे.

रस्ता दुरुस्ती करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने येत्या निवडणुकीत संपूर्ण चकलोहारा गावातील सर्व नागरिकांच्या एकमताने ठरविले आहे कि जो पर्यंत आमच्या गावचा रस्ता तयार होत नाही तो पर्यंत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था व इतर सार्वजनिक निवडणुकीस मतदानाचा बहिष्कार करू, असे निवेदन चिमूर च्या तहसिलदार यांच्या मार्फत चंद्रपूर जिल्हाधिकारी ,बांधकाम मंत्री , पालकमंत्री , आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अभियंता यांना पाठविले आहे. यावेळी किशोर घोळमोडे, शुभम मंडपे, संदीप ठाकरे , विशाल चौधरी, यांच्यासह गावकरी उपस्थित होते .

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular