HomePoliticalगोसेखुर्द उजवा कालव्याच्या पाणी प्रश्नावरून ,विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार ॲक्शन मोडवर...

गोसेखुर्द उजवा कालव्याच्या पाणी प्रश्नावरून ,विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार ॲक्शन मोडवर रब्बी पिक व उन्हाळी धानाला पाणी न मिळाल्यास मोठे जनआंदोलन

गेल्या वर्ष भरापासून गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या आरबीसी कॅनलचे काम अतिशय संथ गतीने होत असल्याने 15 हजार हेक्टर शेतीला याचा फटका बसत असून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. आज ब्रम्हपुरी तालुक्यातील व परिसरातील रब्बी हंगामातील शेती तसेच उन्हाळी धान शेतपिकांना पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेऊन गोसेखुर्द उजवा कालवा विभाग ब्रम्हपुरी कार्यालयाला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत धडक देत शेतकऱ्यांच्या रास्त मागणीला न्याय देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून सत्ता पक्षातील नेत्याचा कंत्राटात सहभाग असल्याने कालव्याचे काम संथ गतीने सुरू असून यावर 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध न केल्यास मुख्य अभियंता कार्यालयाला घेराव घालणार सोबतच शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारणार असा सज्जड इशारा यावेळी विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी दिला.

विदर्भातील सर्वात मोठा जल प्रकल्प म्हणून गोसेखुर्द प्रकल्प प्रसिद्ध आहे. या प्रकल्पाची मुहूर्तमेढ करतांना तसेच विदर्भातील शेती ओलिताखाली यावी याकरिता काँग्रेस सत्ताकाळात राज्यमंत्री असतांना विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अथक प्रयत्नातून तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे कार्यकाळात गोसेखुर्द प्रकल्पाकरिता 5 हजार कोटींचा विकास निधी मिळवून दिला. याचा फायदा आज विदर्भातील अनेक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना होत असून लाखो हेक्टर शेतीला मुबलक पाणी मिळत आहे. याच प्रकल्पा अंतर्गत उजव्या कालव्यातून लगतच्या परिसरातील शेतीला रब्बी पिक तसेच उन्हाळी धान शेतपिकांना पाणी उपलब्ध व्हावे.या हेतूने विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अथक प्रयत्नातून आरसीबी कॅनल कामाला मंजुरी मिळवून दिली.
मात्र मागील वर्षीपासून गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या आरसीबी कॅनलचे (ऑक्टोबर 2024 मधे कार्यारंभ आदेश, अंदाजित किंमत 250 कोटी) काम थंडबस्त्यात आहे. यात कंत्राटदारांनी केवळ 10 टक्के काम करून शेतकऱ्यांच्या पल्लवीत झालेल्या आशेवर पूर्णतः पाणी फेरण्याचे काम केले.

ब्रम्हपुरी तालुक्यातील तसेच उजवा कालवा शेती पाणीपुरवठा लाभार्थी शेतकऱ्यांना न्याय आज विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी गोसेखुर्द प्रकल्प उजवा कालवा कार्यालय ब्रम्हपुरी येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत आरसीबी कालव्याच्या प्रश्नावरून त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर कामाचे कंत्राट सर्ला व खडतकर या कंपनी कडे असून सत्ता पक्षातील नेत्याचा कंत्राटात सहभाग असल्याने कामात दिरंगाई व अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले. यावर विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी थेट मुख्य अभियंता गवळी यांना फोनवरून संवाद साधत येत्या 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी न मिळाल्यास कार्यालयाला घेराव घालणार तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारणार असा सज्जड इशारा दिला. यावर सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांना लवकरच शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल असे मुख्य अभियंता गवळी म्हणाले. यानंतर शेतकऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन उपस्थित कार्यकारी अभियंता संदीप हासे यांचेकडे सुपूर्द केले.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular