HomePoliticalया तारखेला लागेल मनपा निवडणुकीची अंतिम यादी

या तारखेला लागेल मनपा निवडणुकीची अंतिम यादी

निवडणुक आयोगाने दिले वेळापत्रक
चंद्रपूर:
चंद्रपूर सह राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता थेट राज्य निवडणुक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
या नुसार 10 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 28 नोव्हेंबर पर्यंत प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करायच्या आहेत. राज्य निवडणुक आयोगाने महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेल्या विधान सभांच्या मतदार याद्या राज्य निवडणुक आयोगाच्या वेब साईट वरून डाऊनलोड केल्या जातील. 6 नोव्हेंबर पर्यंत महानगर पालिका एक प्रारूप यादी बनवेल.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular