HomeBreakingआदिवासींचा "जंगोम जन आक्रोश महामोर्चा , जय सेवा घोषणेने चंद्रपुर दुमदुमले

आदिवासींचा “जंगोम जन आक्रोश महामोर्चा , जय सेवा घोषणेने चंद्रपुर दुमदुमले

चंद्रपूर:- आदिवासी समाजात बंजारा. धनगर व तत्सम्‌ जाती असंविधानिकरित्या शासनावर दबाव तंत्राचा वापर करत आहेत. यातून आदिवासींच्या अर्थात अनुसूचीत जमातीच्या राखीव जागेवर अतिक्रमन करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी शहरात आदिवासींचा जंगोम जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.

कोहिनुर मैदानातून या महा मोर्चाची सुरुवात झाली. पुढे अंचलेश्वर गेट गांधी चौक होत मुख्य मार्गाने हा महा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळला. आदिवासींचे पारंपरिक पोशाख, आदिम संस्कृतीचे वाद्य आणि गीत तसेच घोषणाबाजी करत हा महा मोर्चा जटपुरा गेट होत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचला. या ठिकाणी एका भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. आदिवासींच्या विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षातील नेत्यांनी या सभेला मार्गदर्शन केले.
या महामोर्चात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतूनआदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. अनुसूचित जमातीच्या यादी मध्ये बंजारा, धनगर व उत्तर जातींचा समावेश करू नये, आदिवासींच्या जमिनी भाडे तत्वावर देऊ नये यांसह सात मुख्य मागण्या घेऊन सोमवारी हा जंगोम जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा निमित्त शहरातील दोन्ही मुख्य मार्ग नो हॉकर झोन घोषित करण्यात आले होते. सकाळी ११ ते सायंकाळी सडे ६ पर्यंत वाहतूक बंदी ठेवण्यात आली. मोर्चायातील वाहनांसाठी सुद्धा विशेष पार्किंग ठरवून देण्यात आल्या

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular