तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून, त्यांना विज टेंडर कामाकरीता 500 रुपयाचे 3 व 100
रूपयाचे 5 असे एकुण 2 हजार रूपयाच्या मुद्रांक पेपरची आवश्यकता होती. त्यासाठी मुद्रांक पेपर
विक्रेत्या मनिष देशमुख याने त्यांच्याकडे प्रत्येक 500 रूपयाच्या मुद्रांक पेपरवर 30 रूपये असे 3 पेपरचे
90 रूपये व प्रत्येक 100 रूपयाच्या मुद्रांक पैपवर 10 रूपये असे 5 पेपरचचे 50 रूपये असे एकूण 2
हजार रूपयांच्या मुद्रांक पेपरवर अतिरीक्त 140 रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची आरोपी
मनिष देशमुख याला लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी 30 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक
विभाग कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 31 ऑक्टोबरला सापळा रचून मुद्रांक पेपर विक्रेता मनिष
देशमुख याने 500 रूपयाचे 3 व 100 रूपयाचे 5 मुद्रांक पेपर असे एकूण 2 हजार रुपयाच्या मुद्रांक
पेपरवर 2 हजार रूपये शासकीय शुल्कासह अतिरीक्त 140 रूपये लाच रक्कम असे एकूण 2 हजार
140 रूपये स्विकारून मदतनीस रूपाली चौधरी हिच्याकडे दिल्याने त्यास रंगेहात पकडण्यात
आले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरच्या पोलिस उप अधीक्षक मंजुषा भोसले यांच्या
मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक निलेश उरकुडे यांच्या नेतृत्वात पोलिस शिपाई अमोल सिडाम यांनी केली



