HomeGraminगोंडपिपरीत कत्तलीसाठी नेणाऱ्या दहा जनावरांची सुटका, चार जणांना अटक

गोंडपिपरीत कत्तलीसाठी नेणाऱ्या दहा जनावरांची सुटका, चार जणांना अटक

गोंडपिपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध गोवंश तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी रविवारी
सकाळी कारवाई करत दहा गोवंशीय जनावरांची सुटका केली. विठ्ठलवाडा बसस्थानकाजवळील
भंगाराम-तळोदी मार्गावर सकाळी नऊच्या सुमारास ही धडक कारवाई करत चार जणांना अटक केली आहे. सुधाकर निकोडे, सुधाकर झाडे, अमर मडावी, प्रभाकर कन्नाके असे अटकेतील
आरोपींचे नाव आहे. या चार आरोपींविरुद्ध गोंडपिपरी पोलीस ठाण्यात गुन्हा
नोंदविण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular