Homesocialवरिष्ठ तंत्रज्ञ विजू बांदूरकर या कर्मचाऱ्याला मारहान प्रकरण तापले

वरिष्ठ तंत्रज्ञ विजू बांदूरकर या कर्मचाऱ्याला मारहान प्रकरण तापले

वरोरा शहर एम एस ई.बी चे सहाय्यक अभियंता प्रफुल लालसरे यांचे एक प्रकरण समोर आले असून त्यांनी चक्क आपल्या हाताखाली काम करणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञ विजू बांदूरकर या कर्मचाऱ्याला मारहान केल्याचा आरोप आहे. सदर प्रकरणी त्यांचे विरोधात वरोरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र पोलिसांनी हे प्रकरण तपासात ठेवल्याचे समजते.
काही महिन्यापूर्वी लालसरे यांची बदली झाली असतांना ते इथेच पुन्हा राहण्यास इच्छुक होते, दरम्यान त्यांनी वरिष्ठाकडे मागणी करून पुन्हा हीच जागा बळकावली, असे सांगितले जाते.
तक्रारी नुसार ३ ऑक्टोबर रोजी वरिष्ठ तंत्रज्ञ बांदूरकर हें माढेळी नाक्यावर ११ के. व्ही लाईनचा बंम्पर रात्री ८ ते ८.30 दरम्यान तुटला असता त्या ठिकाणी वायर जोडण्याचे काम करीत होते. अशातच एका वीज ग्राहकाचा फोन आल्याने ते बोलताना महावितरणचे शहर सहाय्यक अभियंता प्रफुल लालसरे यांनी पाहिले. आणि रंगाच्या भरात कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular