HomeGraminवाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी,चिमूर तालुक्‍यातील घटना

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी,चिमूर तालुक्‍यातील घटना

चिमूर तालुक्‍यातील नेरी जवळील रामपूर जंगल शेजारील शेत शिवारात दि. ९ ऑक्टोबरला
दुपारी १ वाजता दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने शेताजवळ गुरे चारत असलेल्या शेतकऱ्यावर हल्ला चढविला. यात शेतकरी गंभीर जखमी झाला. एका महिन्यात चार इसमाना वाघाने जखमी केल्याने या परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. सदर हल्लेखोर वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. रामपूर येथील शेतकरी कैलास धारणे हे गुरे घेऊन
चरण्यासाठी जंगल शेजारी शेतात गेले असता गुरे चारत असताना अचानक दुपारी १ वाजतादरम्यान पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्ल्याने धारणे गोधळले गुरे सैरावैरा पळू लागले. मात्र हातात काठी असल्याने आणि आरडा ओरडा केल्याने त्यांचा जीव
थोडक्यात बचावला.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular