HomePoliticalओबीसी महामोर्चा मध्ये चंद्रपूरच्या हजारो बांधवांचा सहभाग

ओबीसी महामोर्चा मध्ये चंद्रपूरच्या हजारो बांधवांचा सहभाग

ओबीसींच्या आरक्षणाला घेऊन शुक्रवारी नागपुरात महामोर्चा आयोजित करण्यात आला. या महामोर्चा मध्ये चंद्रपूर वरून हजारो ओबीसी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. शुक्रवारी सकाळीच यासाठी शेकडो वाहने सज्ज होती. ओबीसी बांधव विशेषतः महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. मुस्लिम पिंजारा समाजानेही यात मोठ्या संख्येने भाग घेतला. आरक्षण आमच्या हक्काचं, हैद्राबाद जीआर रद्द झालाच पाहिजे अश्या घोषणा देत ओबीसी बांधवांचा ताफा महामोर्चासाठी रवाना होताना दिसून आला.

ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणात ढवळाढवळ करू नये यासाठी सर्व ओबीसी बांधव संघटित झाले असून सरकारने सकारात्मक पावले उचलून न्याय केला नाही तर आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची तयारी सर्वानी दाखवली आहे. मागे या संदर्भात जोड देऊळ सभागृहात बैठकीचे आयोजन यासाठीच करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे शुक्रवारी दिसून आले.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular