HomeGraminनकोडा येथे पुन्हा वाघाची दहशत, वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

नकोडा येथे पुन्हा वाघाची दहशत, वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना आज रविवारी सकाळी नकोडा येथील रेती घाट परिसरात घडली .या परिसरात वाघ ठाण मांडून असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे . त्यामुळे वनविभागाने तात्काळ या वाघाच्या बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

नकोडा येथील मधुकर अवधान यांची गाय रेती घाट परिसरात फिरत होती . सकाळचा सुमारास झुडपात दबा धरुन बसलेल्या वाघाने गायवर हल्ला करून गंभीर जखमी केले . मधुकर अवधान यांचे जवळपास ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे . नुकसानीची तातडीने भरपाई देण्याची मागणी माजी सभापती ब्रिजभुषण पाझारे व सरपंच किरण बांदुरकर यांनी वनविभागाकडे केली आहे.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular