HomePoliticalघुग्घुस मध्ये काँग्रेसचे अभिनव आंदोलन , खड्ड्यात झोपून आंदोल

घुग्घुस मध्ये काँग्रेसचे अभिनव आंदोलन , खड्ड्यात झोपून आंदोल

घुग्घुस मध्ये काँग्रेसचे अभिनव आंदोलन , खड्ड्यात झोपून आंदोलन

राजीव रतन रेल्वे फाटकाजवळील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था

घुग्घुस येथील राजीव रतन रेल्वे फाटकाजवळ रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून, रस्त्यावर मोठमोठे, जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, दैनिक प्रवाशांना, विशेषतः दुचाकीस्वार व छोट्या वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

.

आज घुग्घुस शहर काँग्रेस तर्फे राजीव रतन रेल्वे फाटकाजवळ खड्ड्यात झोपून आंदोलन करण्यात आले .या आंदोलनामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. या खड्यात घुग्घुस शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजुरेड्डी यांनी खड्यात बसून प्रशासनाचा निषेध नोंदविला .

 

चंद्रपूर-घुग्घूस राज्य महामार्ग हा चंद्रपूर पुणे महामार्ग आहे.या महामार्गवरील घुग्घूस शहरातील राजीव रतन चौक याठिकाणी रेल्वे पुलाचे निर्माण काम सुरू आहे.याच भागात सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून,यामध्ये पावसाचा पाणी साचले आहे . त्यामुळे येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून या खड्ड्यात पडून अनेक दुचाकी धारकांचा अपघात होत आहे.प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक होते मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष केले .

 

संतप्त काँग्रेस नेत्यांनी आज मंगळवारी अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचा निषेध नोंदविला. सार्वजनिक बांधकाम अधिकारी, महारेलचे अधिकारी व आर. के. मदानी कंपनीच्या अधिकाऱ्यावर कारवाई कारवाई अशी मागणी घुग्घुस शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजुरेड्डी यांनी केली .पोलीस निरीक्षकांनी तातळीने प्रशासनाच्या वतीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिल्याने काँग्रेसने आपले अभिनव आंदोलन मागे घेतले.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular