डीआरसी मार्गावर असलेल्या तुकूम परिसरात वाघाचा वावर आहे. मागील काही दिवसापासून त्याचे परिसरात दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असताना शुक्रवारी वाघाने रेड्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली, त्यामुळे वनविभागाने वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
छत्रपतीनगर, डीआरसी मार्गावर नागरिक पहाटेच्या सुमारास फिरायला जातात. तसेच याच भागातील मोकळ्या जागेत योगा करीत असतात. लहानमुले क्रिकेट खेळत असतात. परंतु, मागील काही दिवसापासून डे
बार जवळ वाघाचा वावर दिसून येत आहे. नागरिकांना दोन वेळा वाघाचे दर्शन झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, शुक्रवारी याच परिसरात वाघाने रेडयावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. चंद्रपूर शहरालगत वाघाचा संचार असल्याने सकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले तर परिसरातील नागरीकांसोबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी केली आहे.



