HomeUncategorizedनागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता

नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता

नागपूर ते चंद्रपूर या 204 किलोमीटर लांबी असलेल्या चार पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच चंद्रपूर ते मुल दरम्यान महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मान्यता देण्यात आलेला नागपूर ते चंद्रपूर असा चार पदरी सिमेंट काँक्रिटीकरण महामार्ग राहील ज्याची लांबी २०४ किलोमीटर असेल. चंद्रपूर शहराला ११ किलोमीटर जोड रस्ता करण्यात येईल.
याचा भूसंपादनासह एकूण खर्च २३५३.३९ कोटी रुपये असल्याचे समितीने सांगितले आहे. नागपूर ते चंद्रपूर महामार्ग नवेगाव मोरेपर्यंत करण्यात येत असल्याने पुढे सुरजागड लोह प्रकल्पापर्यंत या महामार्गाची लांबी वाढवण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यामध्ये कुठलाही रस्ता बांधताना रस्त्याच्या परिसरात विकासाची ‘ इकोसिस्टीम’ निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी आधीपासूनच भूसंपादन करून नियोजन करण्याचे निर्देशही दिले.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular