HomeBreakingचंद्रपुरात एमडी ड्रग्ससह दोघांना अटक, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपुरात एमडी ड्रग्ससह दोघांना अटक, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर शहरातील वन अकादमी समोर एम.डि. ड्रग्स पॉवडर विक्री करिता घेउन येणार आहे, अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने नकाबंदी करून १६० ग्रॅम ड्रग्स जप्त करीत दोन आरोपींना अटक केली . पोलिसांनी कारसह एकूण १६ लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. दीपक कृष्णा वर्मा ,आशिष प्रकाश वाळके , असे अटकेतील आरोपीचे नाव आहे .

रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वन अकादमी समोर दोघे जण एमडी ड्रग्स घेऊन
येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाला मिळाली होती.पोलिसांनी सापळा रचून वन अकादमी समोर नाकाबंदी केली .दरम्यान एक संशहित कार जवळ येताच कारची झडती घेतली असता कारमध्ये १६० ग्रॅम एम.डि. ड्रग्स पॉवडर आढळून आला . पोलिसांनी दीपक कृष्णा वर्मा ,आशिष प्रकाश वाळके या दोघांना अटक करून कारसह एकूण १६ लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.हि कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन ,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांचा मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने केली .

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular