माणसांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी व्यापारिक प्रतिष्ठानांचे सुरु राहणे आवश्यक असते.
बरेचदा इमर्जन्सी मध्ये दुकाने बंद असतात त्यासाठी गरजू ला दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागते मात्र आता शासनाच्या उद्योग विभागानेच एक महत्वाचा निर्णय घेत जवळपास सर्वच दुकाने चोवीस तास सुरु राहतील अशी तजवीज केली आहे त्यानुसार चंद्रपूरातही नागरिकांना चोवीस तास सेवा घेता येणार आहे
राज्यातील दुकाने आणि हॉटेल्स सोबतच इतर गरजेच्या आस्थापनांना २४ तास खुले ठेवण्याची मंजूरी राज्य सरकारने दिली आहे. या संदर्भात राज्य सरकारने अद्यादेश काढला आहे. मद्य विक्री करणारी आणि मद्य पुरवणारी दुकाने वगळून इतर सर्व आस्थापनांना २४ तास खुले ठेवण्याची सूट देण्यात आली आहे. परंतू, आता संपूर्ण महाराष्ट्रातच २४ तास दुकाने सुरु ठेवण्याची मंजूरी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आता नाईट लाईफ सुरु होणार आहे. यातून मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार यांना वगळण्यात आले आहे



