HomeUncategorizedएकोरी वार्ड येथे दीड लाखांची विदेशी दारू जप्त

एकोरी वार्ड येथे दीड लाखांची विदेशी दारू जप्त

दरूबंदी हटल्यावरही अवैध दारू विक्री सुरूच आहे गुरुवारी रात्री शहर पोलिसांच्या डीबी पथकाने धाड टाकत एकोरी वार्डातील एका घरातून सुमारे दीड लाख रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आले असून सुनील कुमार मुल्ले असे त्याचे नाव आहे.

गुरुवारी शहर पोलिसांचे डीबी पथक गस्तीवर असताना पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय कोलटे यांना मुखबीरव्दारे एकोरी वॉर्डातील आरोपी सुनिलकुमार मुल्ले याच्या घरून अवैध्यरित्या विदेशी दारू विकली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याच्या घरी धाड टाकली असता १ लाख ५४ हजार ४९० ची विदेशी दारू मिळून आली. शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular