HomeGraminवाढोणा , सावरगाव, वलणी परिसरात अस्वलाचा दोन पिल्लांसह मुक्त संचार

वाढोणा , सावरगाव, वलणी परिसरात अस्वलाचा दोन पिल्लांसह मुक्त संचार

नागभिड तालुक्यातील तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील वाढोणा , सावरगाव व वलनी गाव परिसरात अस्वलीचा मुक्त संचार दिसून आला असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .वाढोणा गावात शुक्रवारी रात्री एकटी अस्वल फिरताना दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याची माहिती मिळताच स्वाब फाउंडेशनची टीम आणि वन विभागाचे अधिकारी गावात दाखल झाले.

त्यांनी मध्यरात्रीपर्यंत गस्त घालून, फटाके फोडून अस्वलास हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र शनिवारी सायंकाळी तीच अस्वल आपल्या दोन पिलांसह सावरगाव परिसरातील शेतशिवारात दिसली. अस्वलाचे कुटुंब शेतशिवारात दिसताच नागरिकांनी तिला दूर करण्यासाठी पाठलाग केल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. यामुळे अस्वल हल्ला करण्याची शक्यता होती. या धोकादायक कृत्याबद्दल वन विभाग आणि स्वाब टीमने वन्यजीवांचा पाठलाग न करण्याचे आवाहन केले आहे.

अस्वल आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वाब फाउंडेशन आणि वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फटाके फोडून अस्वलास जंगलाच्या दिशेने हाकलून लावले. तसेच, परिसरामध्ये रात्रीसाठी तात्पुरती गस्ती टीम तयार करण्यात आली आहे. शेतशिवार परिसरात हिस्त्र प्राण्यांचा वावर दिसून येत असल्यामुळे नागरिकांत भितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे . तरी वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे .

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular