चंद्रपूर शहरातील बिनबा गेट परिसरातील एका घरून सोन्याचा दागिन्यांसह रोख रक्कम चोरीला गेली होती .या प्रकरणी एका अल्पवयीन मुलास शहर पोलिसांनी अटक केली आहे .त्याच्याकडून १७ मोबाईल , एक ऍपल कंपनीचा लॅपटॉप , सोन्याचे दागिने ,एक मोपेड गाडी , असा एकूण तीन लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २२ सेप्टेंबरला चंद्रपूर शहरातील बिनबा गेट परिसरातील एका घरी चोरट्याने घरफोडी केली . या घटनेत १८ हजार रुपयाचे दागिने आणि आठ हजाराची रोख रक्कम चोरीला गेली होती. यावेळी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .शहर पोलिसांनी गोपनीय माहितीचा आधारे आरोपीचा शोध घेतला असता सदर गुन्हा विधिसंघर्ष बालकाने केल्याचे उघड झाले . पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याची कसून विचारपूस केली असता त्याने बिनबा गेट परिसरातील एका घरी घरफोडी आणि १७ वेगवेगळे मोबाईल ,एक ऍपल कंपनीचा लॅपटॉप,सोन्याचे दागिने ,एक मोपेड गाडी चोरल्याची कबुली दिली .पोलिसांनी त्याच्याकडून एकूण तीन लाख २३ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला .हि कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांचा नेतृत्वात करण्यात आली.



