HomeCrimeबिनबा गेट परिसरातून घुटकाला ची घरफोडी उघड

बिनबा गेट परिसरातून घुटकाला ची घरफोडी उघड

चंद्रपूर :शहरातील बिनबा गेट परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या अल्पवयीन चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकान तात्काळ कारवाई करून पकडले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना सोन्याच्या दोन अंगठ्या मिळाल्या असून, या अंगठ्या घुटकाळा वॉर्ड येथील एका घरफोडीतील असल्याचे उघड झाले आहे.
शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात गस्त घालत असताना बिनबा गेट शांतीधाम परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना एका विधी संघर्षरत किशोराला ताब्यात घेण्यात आले.
पंचासमक्ष अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडून सोन्याच्या दोन अंगठ्या (अंदाजे किंमत ₹१ लाख) मिळून आल्या. विचारपूस केली असता त्याने घुटकाळा वॉर्ड परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली.
सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून पुढील तपासासाठी बालक व जप्त सोन्याचा माल पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे हस्तांतरित करण्यात आला आहे.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular