HomeGraminनरभक्षक वाघाच्या शोधासाठी वनविभागाचा ‘ॲक्शन मोड’ ,आकापूर शेत शिवारात 8 कॅमेरे, 10...

नरभक्षक वाघाच्या शोधासाठी वनविभागाचा ‘ॲक्शन मोड’ ,आकापूर शेत शिवारात 8 कॅमेरे, 10 कर्मचारी तैनात

नागभीड तालुक्यातील आकापूर येथील शेत शिवारात शुक्रवारी सायंकाळी शेतात गेलेल्या 55 वर्षीय शेतकरी वासुदेव वेटे यांचा दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जीव घेतल्यानंतर वाघाचा बंदोबस्त करण्याकरता वन विभागाने पावले उचलले आहेत. घटनास्थळ व परिसरामध्ये सात ट्रॅप व एक लाईव्ह कॅमेरे लावून वाघाच्या हालचालीवर निगराणी ठेवले जात आहे. तसेच दहा कर्मचाऱ्यां चमूने गस्त सुरू केली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या रात्री त्याच घटनास्थळी वाघाच्या आगमन झाले आहे. घटना सर्व परिसरात वाघाचे भ्रमंती दिसून येत असल्याने वनविभागाने आकापूर परिसरातील शेतकऱ्यांना सुरक्षा करता जम्मू तैनात केलेली आहे. हे कर्मचारी शेतशिवार आणि आजूबाजूच्या परिसरात दिवसरात्र गस्त घालत आहेत.

सदर शेतकऱ्याचा बळी घेणारा हाच वाघ आहे का, याची खात्री करण्यासाठी लाईव्ह कॅमेरा निरीक्षण आणि ट्रॅप तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. वाघाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे. वाघाला बेशुद्ध करून पकडण्याची आणि सुरक्षितपणे बंदोबस्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular