HomeBreakingवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार , चिमूर तालुक्यातील घटना , नागरिकांचा वनविभागावर तीव्र...

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार , चिमूर तालुक्यातील घटना , नागरिकांचा वनविभागावर तीव्र आक्रोश वाघाचा बंदोबस्त दोन दिवसात करा, रास्ता रोको आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा

पट्टेदार वाघाचा हल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना रविवारी चिमूर तालूक्यातील शिवरा गावात घडली .निलकंठ भुरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे . चिमुरमध्ये एका महिन्यात हि दुसरी घटना आहे. यामुळे नागरीकांमध्ये वन विभागाच्या विरोधात तिव्र संतापाची लाट बघावयास मिळत आहे. तर मागील 48 तासात चंद्रपूर जिल्हयातील ही तिसरी घटना आहे.प्राप्त माहितीनुसार निलकंठ भुरे हे रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेतामध्ये गेले असता पट्टेदार वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. निलकंठ भुरे हे सायंकाळी घरी परत न आल्याने नातलग व गावातील नागरीकांनी शेतामध्ये जाऊन पाहील्या नंतर ही घटना उघकीस आली.

या घटनेची माहिती वनविभागास मिळताच घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करण्यात आला . वाघाचा व वन्यप्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा तसेच तात्काळ आर्थिक मदत करून परीवारातील एका सदस्याला वनविभागात नौकरी देण्यात यावी.अशी मागणी नगरीका कडून केली जात आहे. मागणी मान्य न केल्यास दोन दिवसात पुन्हा रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा गावातील आजी – माजी सरपंच तथा गावकऱ्यानी वनविभागाला दिला

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular