चंद्रपूर : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरु झाली असून, याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन गुरुवारी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत करण्यात आले. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी
दि. ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान हरकती नोंदविण्याची मुभा देण्यात आली आहे. या बैठकीत मतदार याद्यांच्या पडताळणीची दिशा, पद्धत व हरकती नोंदविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांमधील त्रुटी शोधून त्यावर हरकती नोंदवाव्यात असे आवाहन सुद्धा करण्यात आले. या कामात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा आणि ही प्रक्रिया अधिक पारदर्शकपणे पार पाडावी असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी केले आहे.
यावेळी खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीला शहर काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रेय, प्रविण पडवेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय गावंडे, प्रमोद चौधरी, अनिल नरुले, रंजन लांडे, उत्तमराव पेचे, गोविंदा उपरे, प्रशांत काळे, मिलिंद भोयर, देवेंद्र आर्या, नितीन गोहणे, रमाकांत लोधे, सूरज गावंडे, विलास टिपले यांसह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



