स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,ड्रग्स तस्करीचे मुंबई कनेक्शन उघड
चंद्रपुरात दारूबंदीच्या काळात सुरु झालेला ड्रग्सचा गोरखधंदा थेट मुंबई पर्यंत पोहोचला असून तस्कर मुंबईहून कारने चंद्रपूर शहरात येऊन तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने सापळा रचून मुंबईच्या एका तस्कराला अटक केली आहे. त्याचा कडून ५२८ ग्रमचा २६ लाख ४० हजार एमडी ड्रग्स जप्त करून कारसह ३५ लाख ७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वसीम इमादाद खान असे अटकेतील आरोपीचे नाव आहे .
चंद्रपूर पोलिसांची हि मोठी कामगिरी असल्याचे सांगत जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सांगितले कि 5 ऑक्टोबरच्या दुपारी गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून नागपूर महामार्गावरील साखरवाही फाटा परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता. त्यानुसार आरोपी वसीम इमदाद खान हा त्याची कार ने पोहोचला.
पोलिसांनी कारची झडती घेतली असता कार मध्ये अर्ध्या किलो पेक्षा अधिक ड्रग्स पावडर
आढळून आला . पोलिसांनी पंचनामा करून हे ड्रग्स जप्त केले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली .. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे .
हि कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन ,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांचा मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने केली .



