HomeGraminवढा रेतीघाटावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरूच,वाळू उपशावरील कारवाई थंडावली

वढा रेतीघाटावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरूच,वाळू उपशावरील कारवाई थंडावली

घुग्घुस शहरातील पांढरकवळा वढा तीर्थ क्षेत्रांतर्गत तीन नद्यांच्या संगमस्थळी रात्रीपासून ते पहाटेपर्यंत सात ते आठ ट्रॅक्टरद्वारे बेकायदेशीरपने वाळू तस्करी सर्रासपणे सुरू असल्याचे स्थानिक शेतकरी बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

या तस्करीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतात जाणाऱ्या मार्गांची दुरवस्था झाली असून, वाळू माफियांनी शेतमार्गावर मोठमोठे खड्डे व चिखल निर्माण करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतात जाण्यास प्रचंड अडचणी येत आहेत.

या बेकायदेशीर वाळू वाहतुकीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल तोटा होत असून, परिसरात प्रदूषण वाढून पिकांचे नुकसान होत आहे.

स्थानिक नागरिक, शेतकरी बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांनी महसूल अधिकारी व घुग्घुस पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ कारवाई करून वाळू वाहतुकीसाठी वापरला जाणारा मार्ग कायमस्वरूपी बंद करावा, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular