काँग्रेस चे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या बद्दल एका लाईव्ह टीव्ही शो मध्ये अत्यंत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप प्रवक्त्याचा घुग्गुस येथे तीव्र निषेध करण्यात आला. देशभर या वक्तव्याचा निषेध होत असून काँग्रेस कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने या प्रकाराचा निषेध करत आहेत. घुग्गुस येथेही मंगळवारी काँग्रेस च्या संतप्त नेते पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रवक्ता पिंटू महादेव याच्या निषेधाच्या घोषणा देत त्याच्या प्रतिमेला शेणा फासत निषेध केला संताप अनावर झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पिंटू महादेव च्या प्रतिमेला चप्पल जोड्यांनी हाणून आपला रोष व्यक्त केला.
घुग्गुस मध्ये शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी घुग्गुस शहर काँग्रेस चे राजू रेड्डी सह अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते एका लाईव्ह टीव्ही शो मध्ये बोलताना भाजपचा प्रवक्ता पिंटू महादेव याची जीभ सुटली आणि त्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गोळी झाडून ठार मारण्याची उघड धमकी दिली हा एका षडयंत्राचा भाग असून याची चौकशी व्हावी आणि त्या प्रवक्त्याला तात्काळ पदच्युत करावे अश्या स्वरूपाची मागणी देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत आहे त्या पार्श्वभूमीवर घुग्गुस येथेही तीव्र संताप व्यक्त करत त्या भाजप प्रवक्त्याचा जाहीर निषेध करण्यात आला अशी माहिती घुग्गुस काँग्रेसस चे नेते राजू रेड्डी यांनी दिली आहे



