भद्रावती: न्यायालयाच्या आदेशानुसार सातबारा फेरफार करण्याबाबत तहसील कार्यालयात केलेल्या अर्जाचा तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांनी विचार न केल्याने अखेर कंटाळून पीडित शेतकऱ्याने विष प्राशन केले.अखेर ११ व्या दिवशी उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.चंद्रपूर तालुक्यातील मोरावा निवासी ५५ वर्षीय परमेश मेश्राम असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. प्रशासनासोबत संघर्ष करताना हरलेल्या आणि न्यायासाठी विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे अखेर जीवन-मृत्यूशी संघर्ष करताना १० दिवसानंतर दि.६ऑक्टोबरच्या पहाटे ३ वाजता चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयत अखेरचा श्वास घेतला. मेश्राम यांच्या निधनाची माहिती कळतात समाज मन सुन्न झाले आहे. पाषाण हृदयी प्रशासनाची या घटनेने सर्वत्र निंदा होत आहे.
शेतकरी संघटना आक्रमक झाली असून त्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना प्रशासनाने न्याय द्यावा अन्यथा आंदोलन उभारू असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. परमेश मेश्राम यांचे भद्रावती तालुक्यातील कुरोडा येथे शेत आहे.न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांनी तहसील कार्यालयात प्रकरण दाखल केले होते.परंतु सदर प्रकरणावर तहसीलदारांनी कोणताच निर्णय न घेतल्याने अखेर मेश्राम यांनी दि.२६ सप्टेंबरला तहसीलदाराच्या कक्षासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अखेर उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.



