वाघाच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी नागरिक चांगलेच आक्रमक होऊन राष्ट्रीय महामार्गवर तणावाची स्थिती निर्माण झाली होती . गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी गावात रविवारी सायंकाळी
वाघाच्या हल्ल्यात अल्का पेंदोर या महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला . त्यामुळे गावात भिती व दहशतीचे वातावरण आहे. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या अल्का पेंदोर या
उशिरापर्यंत घरी पोहचल्या नाहीत. त्यामुळे गावक-यांनी शेतशिवार गाठले असता शेतात मृतदेह आढळून आला.या घटनेनंतर परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने गस्त वाढविली.मात्र वनविभागाला यात अपयश आले. वन विभागाने कुटुंबियांना माहिती न देता घटनास्थळ येथून मृतदेह हलवील्याने संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग बंद केला. आज सोमवारी अहेरी-नागपूर राज्य मार्गांवर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले .आज गोंडपीपरी मधील बाजारपेठ बंद करण्यात आले होते . वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली .
मागील काही दिवसापासून गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव, वटराणा, गणेशपिपरी,चेकपिपरी व परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. गावात वाघाची दहशत असल्याने वाघाचा बंदोबस्त
करावा वाघाला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थानी वन विभागाकडे केली आहे. मात्र वाघाला जेरबंद करण्यात वन विभाग अपयशी ठरला आहे. आठ दिवसात वाघाने दोन जणांचा बळी घेतल्याने
ग्रामस्थ संतापले आहेत.
व परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. गावात वाघाची दहशत असल्याने वाघाचा बंदोबस्त करावा वाघाला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थानी वन विभागाकडे केली आहे. मात्र वाघाला
जेरबंद करण्यात वन विभाग अपयशी ठरला आहे. आठ दिवसात वाघाने दोन जणांचा बळी घेतल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.



