HomePoliticalमहायुती सरकारच्या फसव्या पॅकेजविरोधात चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने...

महायुती सरकारच्या फसव्या पॅकेजविरोधात चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेधात्मक काळी दिवाळी

चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके , यांच्या नेतृत्वात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या फसव्या पॅकेजचा तीव्र निषेध करण्यात आला.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी ५०,००० मदत, आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ७५,००० प्रोत्साहनपर मदत या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांच्या घरात आजही अंधार असून ही दिवाळी सरकारने शेतकऱ्यासाठी काळी केली आहे ,म्हणून ही काळी दिवाळी आहे .जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular