चंद्रपूर, दि. १
संविधान, लोकशाही आणि संवैधानिक संस्था वाचविण्यासाठी जनजागृती पदयात्रा निघाली आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघालेल्या या पदयात्रेत सामील होण्यासाठी आज चंद्रपूरहून भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
गांधीजी के रस्ते असा नारा बुलंद करत बुधवारी ही रॅली स्थानिक गांधी चौकातून रवाना झाली. ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस च्या माध्यमातून ही बाईक रॅली गांधी चौकातून घुग्गुस फाटा मार्गाने भद्रावती, मांडगाव वरोरा आणि पुढे खांबाडा होत सेवाग्राम ला पोहोचेल.

सेवाग्राम येथिल बापू कुटी मध्ये प्रार्थना सभेत सर्व कार्यकर्ते भाग घेतील. उल्लेखनीय म्हणजे नागपूर दीक्षाभूमी वरून पदयात्रेची सुरुवात झाल्यानंतर खासदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेस नेते सुनील केदार, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्यासह पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.



