HomeUncategorizedएसटी बसेस मध्ये दिव्यांगांना आरक्षण न दिल्यास होणार कारवाई

एसटी बसेस मध्ये दिव्यांगांना आरक्षण न दिल्यास होणार कारवाई

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये दिव्यांगांसाठी चार आसन आरक्षित ठेवण्यात आले आहेत. कुठल्याही थांब्यावरून दिव्यांग प्रवासी बसमध्ये चढल्यास त्यांना ही आरक्षित सीट उपलब्ध करून देणे आता अनिवार्य झाले आहे तसे न केल्यास बस कंडक्टर सह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे आज वर बस कंडक्टरकडून सीट उपलब्ध करून दिली जात नसल्याच्या तक्रारीं होत होत्या त्याची गंभीर दखल वाहतूक महाव्यवस्थापकांनी घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर, नुकताच एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, यापुढे अशी कोणतीही तक्रार आल्यास संबंधित विभागीय वाहतूक अधिकारी आणि डेपो व्यवस्थापक यांच्यावर थेट कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच, भविष्यात अशा तक्रारी वारंवार आल्यास थेट विभागीय वाहतूक अधिकारी आणि डेपो व्यवस्थापक यांच्यावर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा एसटी वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिला आहे.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular