HomeBreakingवीज पडून पत्नीचा मृत्यू, पतीसह दोन जण जखमी, राजुरा तालुक्यातील पांचाळा शिवारातील...

वीज पडून पत्नीचा मृत्यू, पतीसह दोन जण जखमी, राजुरा तालुक्यातील पांचाळा शिवारातील घटना

कोहपरा – पंचाळा शिवारात काम करीत असलेल्या पती पत्नी च्या अंगावर वीज कोसळल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला . तर पतीसह दोन जण जखमी झाले आहे. ज्योन्स्ना प्रमोद कन्मपलीवार असे २८ वर्षीय मृत महिलेचे नाव आहे . तर प्रमोद कन्मपलीवार ,मंजुषा जिवतोडे, मंदा कन्मपलीवार असे जखमीचे नाव आहे .

कोहपरा – पंचाळा शिवारात अचानक दुपारच्या सुमारास वीजेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली.याच शिवारात ज्योन्स्ना प्रमोद कान्मपलीवार व प्रमोद कन्मपलीवार हे दाम्पत्य काम करीत होते.अचानक शिवारात वीज कोसळली व त्यात २८ वर्षीय पत्नी ज्योन्स्ना कन्मपलीवार हिचा जागीच मृत्यू झाला व पती प्रमोद कन्मपलीवार जखमी झाला. त्याचा सोबत काम करणाऱ्या मंजुषा जिवतोडे व मंदा कन्मपलीवार दोन महिला जखमी झाल्या आहे. या तिघांवर राजुरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सागर भटपल्लीवार, राजुरा प्रतिनिधी

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular