राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मदत पॅकेजमधून सुरुवातीला चंद्रपूर जिल्ह्याला जाणूनबुजून वगळले होते. मात्र काँग्रेसच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सरकारला शेवटी चंद्रपूरचा समावेश करावा लागला, पण त्यातही गोंडपिपरी तालुक्याला वगळण्यात आले आहे. ही मानसिकता लोकशाही विरोधी असून आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. असा खणखणीत इशारा शुक्रवारी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला. गोंडपिपरी मध्ये जण आक्रोश चक्का जाम आंदोलन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आम्ही लढतो आणि लढत राहू. सत्ता येते जाते परंतु गोर – गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न कधी थांबणार नाहीत. महायुती सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न दुर्लक्षित केला आहे. कर्जमाफी, पिकांना हमीभाव, दुष्काळ जाहीर आणि पेन्शनधारकांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील असे मत खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले आणि भाजप सरकार वर तीव्र टीका केली.
यावेळी गोंडपिपरी तालुका काँग्रेसतर्फे सरकारकडे २७ महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन तहसीलदार शुभम बहाकार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले.
शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला व सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या या मागण्यांमध्ये मुख्यत्वे, भाजप सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांची तात्काळ सरसकट कर्जमाफी करून ७/१२ कोरा करणे, ओला दुष्काळ जाहीर करून सर्व पीडित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ मागे घेणे, तसेच राजुरा विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करणे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी मोर्चात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास सातपुते, शहराध्यक्ष राजू झाडे, अशोक रेचनकर, गौतम झाडे, श्रीनिवास कुंदनुरीवार, विपिन पेदुलवार, सूरज माडूरवार, राजू चंदेल, शंभूजी येलेकर, तुकेश वानोडे, सोनूताई दिवशे, फिरोज पठाण, दिपक फलके, राजेश कवठे, अनिल झाडे, रेखाताई रामटेके, नामदेव सांगडे, मनोज नागापुरे, संतोष बंडावार, बालाजी चणकापुरे, अशोक कुडे, शंकर पाल, माधुरीताई येलेकर, पिंपळकर सर, साईनाथ कोडापे, सचिन फुलझले, महेंद्र कुघाडकर, शालिक झाडे, माधव लडके, धीरेंद्र नागापूरे, रफीक शेख, नरेंद्र वाघाडे, सारनाथ बस्की, अभय शेंडे, शुभम पिंपळकर, बबलू कुलमेथे, जितेंद्र गोहणे, राहुल लडके आणि प्रशांत कोसनकर यांसह गोंडपिपरी काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित बेरोजगार, निराधार, आणि हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.



