HomePoliticalघरकुल योजनेत्त 50 हजाराची वाढ, लाभार्थ्यांना सौरऊर्जेसह मिळणार प्रकाश

घरकुल योजनेत्त 50 हजाराची वाढ, लाभार्थ्यांना सौरऊर्जेसह मिळणार प्रकाश

राज्यातील घरकुल लाभार्त्यांना आता 50 हजार अनुदान वाढीव लाभासह सौरऊर्जेचे उपकरण सुद्धा मिळणार आहे, दरम्यान काही ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे व प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागतं असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. त्यामुळे पंचायत समिती स्तरावर एक समिती नेमून घरकुल योजनेला पारदर्शक बनवणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
घरकुल योजनेत वाढलेल्या अनुदानाचा फायदा आता लाभार्थ्यांना सौरऊर्जेसह मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या घरांचे छत उजळून निघेल. घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या एकूण अनुदानात ५० हजारांची वाढ करण्यात आली असून, त्यातील ३५ हजार रुपये बांधकामासाठी आणि १५ हजार रुपये छतावर १ किलो वॅटची सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी देणार आहेत. ही सौरऊर्जा यंत्रणा बसवल्यास घरकुले सौरऊर्जेने उजळणार आहेत.
घरकुल योजना टप्प्याटप्प्यात होणार असून टप्पा क्रमांक दोनमधील पात्र लाभार्थीना ही वाढ मिळणार आहे. १ लाख २० हजार ही अनुदानाची मूळ रक्कम असून, त्यामध्ये ५० हजारांची वाढ झाली आहे. इतर बाबींमधून मजुरी व शौचालय यांची मिळणारी रक्कम व अनुदानातील वाढ यामुळे लाभार्थीना दोन लाखांपर्यंत घरकुल बांधण्यासाठी एकूण अर्थसहाय्य मिळणार आहे.
या योजनेतून घरकुल बांधण्यासाठी १ लाख २० हजार रुपये मूळचे अनुदान मिळत होते. इतर बाबींमधून २६ हजार रुपये मजुरीसाठी मिळत होते. शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये असे १ लाख ५८ हजार रुपये मिळत होते आता ते 2 लाखापर्यंत करण्यात आले आहे.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular