HomeGraminएसपी साहेब माझी गाढवं मिळवून द्या, निराधार वृद्ध महिलेची आर्त हाक

एसपी साहेब माझी गाढवं मिळवून द्या, निराधार वृद्ध महिलेची आर्त हाक

उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या गाढवांची चोरी झाली. पोलिसांनी सहकार्य केले नाही. आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच काय तो निर्णय घ्यावा अशा भावना व्यक्त करत शुक्रवारी एका ६५ वर्षीय महिलेने एसपी साहेबांना साकडे घातले. चंद्रपुरात घेतलेल्या पत्र परिषदेत गंगुबाई लक्ष्मण पवार या निराधार महिलेने माझी ९ गाढवं मिळवून द्या अशी आर्ट हाक दिली. गंगुबाई हि गडचांदूर निवासी असून गाढवं हीच तिच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. तिच्याकडे दहा गाढवं होती. ९ ऑगस्ट रोजी त्यापैकी ९ गाढवं चोरीला गर्ली.

गडचांदूर ठाण्यात तिने तोंडी फिर्याद केली. पण काही झाले नाही. एसपी साहेबांना तक्रार केल्यावर पोलिसांनी मंचेरियल ला जाण्याची योजना बनविली मात्र हे करताना वाहन खर्च सुमारे २१ हजार सुद्धा पीडित गंगुबाईनेच सोसला. एकूण चार आरोपींमध्ये ३ तेलंगणा चे असूनही स्थानिक पोलिसांनी गाढवं मिळवून दिली नाहीत. त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनीच आपली गाढवं मिळवून द्यावी अशी मागणी गंगुबाईने या पत्रपरिषदेत केली.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular