HomeCrimeमूल च्या सारडा रिफायनरी मध्ये तेलाची भेसळ

मूल च्या सारडा रिफायनरी मध्ये तेलाची भेसळ

FDA ला जेव्हा जाग येते
चंद्रपूर:
स्थानिक FDA चे मनुष्यबळ आणि ईतर व्यवस्शीथया कमजोर आहेत का? असा प्रश्न पडायला भाग पाडणारी एक घटना स्वतः फडा ने पुढे आणली आहे. मूल येथील सारडा रिफायनरी मध्ये तेलाची भेसळ केली जात असल्याचे त्यांनी उघड केले आहे. खाण्याच्या तेलातील ही भेसळ खूपच गंभीर असून यामुळे थेट लोकांच्या जीवाशीच खेळ होत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. FDA ला जाग कधीही येवो मात्र ही कारवाई करून त्यांनी खळबळ माजवून दिली आहे.
मूल तहसील स्थित सारडा खाद्य तेल रिफाइनरी मध्ये खाद्य तेल भेसळीची मोठी कार्रवाई करण्यात आली. यापूर्वी गांजवर्ड येथे अशीच कारवाई करण्यात आली होती.
फैक्ट्रीवर छापा मारत सोयाबीन तेल चे नमूने केले. या भेसळ चा कारोबार अनेक वर्षांपासून सुरू होता.मात्र हे आतापर्यंत लपून का राहिले, त्याला कुणाचे पाठबळ होते, त्यात काय मिसळले जात होते, ही रिफायनरी बंद करणार का असे अनेक प्रश्न अजून कायम आहेत. एवढेच नव्हे मालकाला फक्त दंड देऊन हा भोंगळ कारभार थांबवणार आहेत की यावर नेहमी लक्ष ठेवायला कुणी नियुक्त केला जाणार आहे? अशी भेसळ फक्त मूल मध्येच होते की आणखी काही ठिकाणे आहेत आणि जर असतील तर त्यांना सावरायला वेळ दिला जाणार आहे का? असेही प्रश्न लोकांना पडले आहेत. सद्या हे प्रकरण चौकशीत आहे.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular