Homeचंद्रपूरवीर शाहिद शेडमाके यांच्या अभिवादन रॅली ने दुमदुमले शहर

वीर शाहिद शेडमाके यांच्या अभिवादन रॅली ने दुमदुमले शहर

वीर शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची पुण्यतिथी आज शहरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने काढलेल्या अभिवादन रॅली ने शहर दुमदुमून गेले. पिवळ्या रंगाच्या खास पोशाखात समाज बांधव या रॅली मध्ये सहभागी झाले होते. शहराच्या विविध भागातून सर्व बांधव स्थानिक जिल्हा कारागृहात असलेल्या शाहिद स्मारक परिसरात एकत्र आले. या ठिकाणी वीर शाहिद बाबुराव पल्सर शेडमाके यांच्या प्रेरक स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने कारागृह परिसरात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला समाजातील विद्वान विचारवंत आणि अभ्यासक समाजसेवकांनी संबोधित केले.
क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचा जन्म 12 मार्च 1833 रोजी तत्कालीन चांदा जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या किस्तापूर येथे झाला. त्या काळात ब्रिटिश सरकार व स्थानिक जमीनदारांनी आदिवासी समाजावर अन्याय, जुलूम आणि करांची सक्ती केली होती. बाबुरावांनी या अत्याचाराविरोधात आवाज उठवला आणि आदिवासी युवकांना संघटीत करून ‘जंगम दल’ नावाचे संघटन उभारले. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाचा प्रभाव संपूर्ण भारतात झाला. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यातही बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र उचलले. आदिवासी योध्दांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांना आव्हान दिले. बाण, दगड, लपत्या कारवाई आदी पारंपारिक ज्ञान व कुशल रणनीतीचा उपयोग करून चांदा परिसरातील ब्रिटिश ठाण्यांवर अचानक हल्ले केले व इंग्रज सैन्याला तीन वेळा पराभूत करण्याचा पराक्रम केला.
क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांनी आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आणि गौरवशाली इतिहास नेहमीच जिवंत ठेवण्याचा संकल्प केला. जंगलातील गोंड, कोलाम, परधान व इतर समाजांना एकत्र करून एकजूट निर्माण केली. ‘आपली जमीन, आपले जंगल, आपले स्वराज्य’ ही घोषणा त्यांनी दिली. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. शेवटी फसवणुकीने त्यांना अटक करण्यात आली. 21 ऑक्टोबर 1858 रोजी चंद्रपूर कारागृह परिसरात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना फाशी देण्यात आली. या दिवसाची प्रेरक स्मृती जिवंत रवावी आणि हा दैदिप्यमान इतिहास नव्या पिढी पर्यंत पोहोचावा म्हणून याठिकाणी शाहिद स्मृती दिनाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular