सहा महिन्यांत तब्बल १२ हजार 33२ कोटी ६२ लाख रुपयांचा महसूल
: राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांत तब्बल १२ हजार 33२
कोटी ६२ लाख रुपयांचा महसूल जमा करून विक्रमी कामगिरी केली आहे. गतवर्षी याच कालावधीत ११ हजार १०१ कोटी 3 लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. म्हणजेच यावर्षी महसुलात तब्बल ११.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्यातील उत्पादन शुल्क विभागाकडून ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर आणि अमरावती या विभागीय कार्यालयांमार्फत कामकाज पाहिले जाते. या कालावधीत नाशिक विभागाने सर्वाधिक महसूल मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे, तर अमरावती विभाग महसुलाच्या तळात राहिला
आहे. सर्वाधिक 3,०९८ कोटी ११ लाख रुपयांचा महसूल नाशिक विभागातून मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 3,०११ कोटी ५८ लाखांचा महसूल मिळाला आहे. पुणे विभागाने १,४२१ कोटी २७ लाख, तर अहमदनगर (अहिल्यानगर) विभागाने १,२१५ कोटी २८ लाख रुपयांचा महसूल मिळवला आहे.



