आगामी होऊ घातलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाने तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखत प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असून, 1 ते 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी यांनी केले आहे.
काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची लवकरच मुलाखत प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. २४ ऑक्टोबरपासून शहर जिल्हा काँग्रेस कार्यालय, तिवारी भवन कस्तुरबा चौक चंद्रपूर येथे अर्ज उपलब्ध राहणार आहेत.
त्यामुळे अर्ज करणाऱ्या इच्छुकांनी अर्जासोबत आपली संपूर्ण आणि अचूक माहिती देणे अनिवार्य आहे.
काँग्रेस विचारधारेच्या आणि परिवर्तन घडवू इच्छिणाऱ्या नवतरुण-तरुणींनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे विशेष आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी केले आहे. पक्षनिष्ठ, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि प्रतिष्ठित नागरिकांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले .



