HomeGraminआ. सुधीर मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील मुलांसोबत साजरी केली दिवाळी दुर्गापूर येथील वार्ड...

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील मुलांसोबत साजरी केली दिवाळी दुर्गापूर येथील वार्ड क्र. ३ मधील झोपडपट्टीमध्ये घालवले आनंदाचे क्षण

सर्वसामान्य जनतेला आपले कुटुंब मानणारे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार. सुधीर मुनगंटीवार यांनी आणखी एका कृतीतून समाजापुढे उत्तम आदर्श निर्माण केला आहे. आपल्या कुटुंबासोबत चौकटीच्या आत साजरी होणारी दिवाळी आ. . मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील मुलांमध्ये जाऊन साजरी केली. मिठाई, शालेय साहित्य तसेच गृहोपयोगी वस्तू देखील यावेळी आ. मुनगंटीवार यांनी वितरित केल्या. ‘निरागस हास्यामध्ये दिवाळीचा खरा आनंद दडला आहे,’ अशी भावना आ. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.त्यांनी मुलांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी परिश्रम करण्याचा सल्ला दिला.दुर्गापूर येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील झोपडपट्टीमध्ये आ. . मुनगंटीवार यांच्या येण्याने आनंदाचे वातावरण होते. लहान मुला-मुलींसह येथील नागरिकांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular