HomeGraminहिरापुर येथील साडेतीन हजार वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक स्थळ ‘मांडवगोटा’कडे पुरातत्व विभागाचे होत आहे...

हिरापुर येथील साडेतीन हजार वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक स्थळ ‘मांडवगोटा’कडे पुरातत्व विभागाचे होत आहे दुर्लक्ष

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका आपल्या समृद्ध ऐतिहासिक परंपरेसाठी ओळखला जातो. याच तालुक्यातील हिरापुर गावाजवळ असलेले ‘मांडवगोटा’ हे महापाषाण युगातील पुरातन स्मारक २०१० साली पुण्याच्या डेक्कन कॉलेज आणि शंकरपूर येथील पर्यावरणवादी मंडळाने संयुक्तपणे उत्खनन केले होते. या उत्खननात दगडांनी बांधलेल्या दोन खोल्या, तांब्याची नाणी, काचेच्या बांगड्या आणि लोखंडी वस्तू सापडल्या होत्या. तज्ज्ञांच्या मते, या अवशेषांवरून त्या काळात मृतदेह या खोल्यांमध्ये पुरले जात असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो. सध्या हे ऐतिहासिक स्थळ पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत असून परिसरात गवत, झुडुपे आणि कचरा साचलेला आहे. माहिती देणारे फलक तुटलेले आणि जिर्ण झाले आहेत. स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांनी शासन आणि पुरातत्व विभागाने एकत्र येऊन या महत्त्वाच्या वारशाचे संवर्धन करावे, अशी मागणी केली आहे. ‘मांडवगोटा’चे योग्य प्रकारे संरक्षण आणि विकास केल्यास हे ठिकाण पर्यटन तसेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासकेंद्र म्हणून विकसित होऊ शकते. त्यामुळे हिरापुर गाव इतिहासाच्या नकाशावर विशेष स्थान मिळवू शकते.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular