Homeचंद्रपूर'चाकणकरांची नार्को टेस्ट करा, मोठे मासे गळाला लागतील'; खरात प्रकरणी सुषमा अंधारे...

‘चाकणकरांची नार्को टेस्ट करा, मोठे मासे गळाला लागतील’; खरात प्रकरणी सुषमा अंधारे यांची आक्रमक मागणी

चंद्रपूर: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खरात प्रकरणाचा संदर्भ देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली असून, चाकणकरांच्या राजीनाम्यावरून खळबळजनक दावा केला आहे.

राजीनामा नव्हे, तर हकालपट्टी: सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “हा राजीनामा स्वेच्छेने दिलेला नसून, ती एकप्रकारे हकालपट्टीच आहे. जेव्हा वरिष्ठांकडून ‘आता तुमची गरज नाही’ असे सांगितले जाते, तेव्हा नाईलाजाने पद सोडावे लागते,” असे अंधारे म्हणाल्या.

नार्को टेस्टची मागणी: या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, रुपाली चाकणकर यांची नार्को टेस्ट (Narco Test) करण्यात यावी, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. या चाचणीतून प्रशासकीय स्तरावरील अनेक बड्या अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे धाबे दणाणतील, असा दावा त्यांनी केला.

सहआरोपी करण्याची मागणी: केवळ पदाचा राजीनामा देऊन हे प्रकरण थांबणार नाही. खरात प्रकरणात चाकणकर यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करून त्यांना ‘सहआरोपी’ करण्यात यावे, अशी आग्रही मागणी अंधारे यांनी चंद्रपूर येथील संवाद दरम्यान केली.

“केवळ पायउतार होणे पुरेसे नाही. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी नार्को टेस्ट आवश्यक आहे. तसे झाल्यास अनेक ‘मोठे मासे’ या जाळ्यात अडकतील,” असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.

या घडामोडींमुळे आता राज्य सरकार आणि सत्ताधारी गट सुषमा अंधारे यांच्या या आरोपांना काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular