HomePoliticalचंद्रपूरच्या खड्डयांवर राज्यमंत्रांनी सुनावले खडे बोल, तात्काळ खड्डे बुजवण्याचे दिले आदेश

चंद्रपूरच्या खड्डयांवर राज्यमंत्रांनी सुनावले खडे बोल, तात्काळ खड्डे बुजवण्याचे दिले आदेश

चंद्रपूर : शहरातील रस्त्यांची दुरावस्था सर्च टीव्ही ने काही दिवसांपूर्वीच पुढे आणली होती. दरम्यान गुरुवारी शहराच्या दौऱ्यावर आलेल्या बांधकाम विभागाच्या राज्यमंत्र्यांनाही या खड्ड्यांचा त्रास झाला. त्यावर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले अगदी ‘रस्त्यात खड्डे की खडुयात रस्ते ‘ या शब्दात खुद्द बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीच खडसावल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. राज्यमंत्री नाईक यांनी हा मूड गंभीरतेने घेतला असून त्यांनी तात्काळ खड्डे बुजवण्याचे आणि अर्धवट कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी गुरुवारी शहराचा दौरा केला. या दरम्यान त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी चंद्रपूरमध्ये ठिकठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट असून बहुसंख्य ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांकडे लक्ष वेधले. प्राधान्याने रस्त्यावरील सर्व खाडडे बुजवावीत अशी सूचना त्यांनी केल्या.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular