HomeBreakingचंद्रपूरातही वीज कामगार ७२ तासाच्या संपावर

चंद्रपूरातही वीज कामगार ७२ तासाच्या संपावर

वीज ग्राहक व जनतेच्या हितासाठी वीज कर्मचारी संपावर

महावितरणच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये अदानी, टोरेंटो सारख्या खाजगी भांडवलदारानी वीज वितरणाचे मागितलेले परवाने देण्यास विरोध आणि इतर मागण्या घेऊन वीज कामगारांनी आज गुरुवारी चंद्रपूर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले .

३२९ विद्युत उपकेंद्रे खाजगी ठेकेदारांना चालविण्यास देणे, महानिर्मिती कंपनीचे ४ जलविद्युत केंद्राचे खाजगीकरण करणे, महापारेषण कंपनी २०० कोटींचे प्रकल्प खाजगी कंपन्यांना देणे, आणि कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्याना घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकाऱ्यांच्या संगठना कृती समितीने हा संप पुकारला आहे . हा संप कोणत्याही आर्थिक मागण्यासाठी नसून वीज ग्राहकांना योग्य व तत्पर सेवा देणे, सार्वजनिक वीज उद्योगाचे खाजगीकरण न करणे तसेच वीज ग्राहकांना स्वस्त वीज दराने वीज उपलब्ध व्हावी. याकरिता करत असल्याचे वीज कर्मचाऱ्यांनी सांगितले.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular