चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर दरवर्षी 15,16 ऑक्टोंबरला धम्मचक्र अनुवर्तन सोहळा साजरा होतो, यानिमित्य प्रमुख प्रस्थापित पक्षाचे पुढारी धम्म मंचावरून राजकीय भाषणे करतात, अप्रत्यक्ष त्यांच्या पक्षाचा प्रचार करतात हे यावर्षी टाळावे अशी मागणी करत बहुजन हितकारिणी सभेने ९ ऑक्टोबर रोजी धम्मसोहळा आयोजक समितीचे प्रमुख अरुण घोटेकर यांची भेट घेतली. नागपूर दीक्षाभूमी वर यावर्षी अश्या प्रकारची भूमिका घेण्यात आली याकडे घोटेकर यांचे लक्ष वेधले. त्यावर घोटेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
बहुजन हितकारिणी सभेने एक निवेदन दिले त्यावेळी झालेल्या चर्चेत नगराळे यांनी आश्वस्त केले कि आयोजनातील व व्यवस्थेतील सुधारणा आणि शिस्त यावर्षी अनुयायांच्या नजरेस आणून दिल्यास पुढील वर्षीपासून समाजातून मोठ्या प्रमाणात धम्मदान मिळविण्यास पुढाकार घेतला जाईल. मात्र दीक्षाभूमीच्या धम्म मंचावरून राजकारण्यांना प्रमोट केल्यास खपवून घेणार नाही व निषेध करू असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. यावेळी एड. पूनमचंद वाकडे, विवेक कांबळे, एड. रवींद्र मोटघरे, विद्याधर लाडे, उषा तामगडे हेही उपस्थित होते.



