चंद्रपूर येथील स्वयंभू सनराईज ग्रामीण विकास बहूदेशीय संस्थेव्दारे
गावोगावी माय इंडिया निधी बँकेची शाखा स्थापन केली. त्या शाखेत एरिया मॅनेजर
पदावर नोकरी देण्याचे आमिष देत महिलांची आर्थिक फसवणूक केली. या
प्रकरणाची तक्रार दाखल केल्यावर आरोपीला नागभीड पोलिसांनी अटक
केली.
राजेंद्र मेश्राम असे आरोपीचे नाव आहे. भारती फुलचंद फाले यांनी नागभीड पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार,
आरोपीने स्वयंभू सनराईज ग्रामीण विकास बहूदेशीय संस्थेव्दारे गावोगावी माय इंडीया निधी बँकेची शाखा स्थापन केली.
त्या शाखेत नोकरीचे आमिष देत महिलांचा विश्वास संपादन केला.
खोटी ऑर्डर तयार करून ती खरी असल्याचे भासवून फिर्यादी तसेच इतर
महिलांची एकुण ५ लाख ३० हजार रुपयांनी फसवणूक केली. प्राप्त
तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी
अटक केली. आरोपीविरोधात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारचे गुन्हे नोंद
असल्याची माहिती आहे.



