HomePoliticalधनगर आणि बंजारा समाजाच्या मागणीवर गंभीर: आठवले

धनगर आणि बंजारा समाजाच्या मागणीवर गंभीर: आठवले


म्हणाले, कुणबी समाजावर अन्याय होऊ नये
चंद्रपूर:
धनगर आणि बंजारा समाजाच्या मागणीवरही सामाजिक न्याय मंत्रालय गंभीरतेने काम करत असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना दिली. सद्या महाराष्ट्रात आदिवासींचा उलगुलान सुरू आहे अशात आठवले यांनी दिलेल्या या माहितीने वातावरण तापण्याची चिन्हे असल्याचे बोलले जात आहे.
आठवले म्हणाले, मराठा आरक्षणाची मागणी सरकार कडे आली होती. त्यानुसार त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू झाले आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे मात्र कुणबी समाजावर सुद्धा अन्याय होऊ नये. सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा युवकांना शिक्षण आणि रोजगारात मोठा लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर विभागाने अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी 300 कोटींचा प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती आठवले यांनी दिली.

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular